पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कपसाठी बारामती तालुक्यातील गावकरी प्रशिक्षणासाठी रवाना

पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कपसाठी बारामती तालुक्यातील गावकरी प्रशिक्षणासाठी रवाना

प्रतिनिधी – 2016 पासून पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करत आहे, यामध्ये तालुक्यातील गावांनी सहभाग नोंदवून खूप मोठं जलसंधारणाचे काम आपल्या सहभागातून केलं, त्याचा पुढचा टप्पा पाणी फाउंडेशन समृद्ध गाव स्पर्धा चालु आहे. त्यातीलच सत्यमेव जयते फार्मर कप हा टप्पा सध्या सुरू आहे. या टप्यामध्ये हंगामनिहाय पिकांचे गट तयार करून त्यामार्फत स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक हंगामासाठी प्रथम येणाऱ्या गटाला 25 लाख रुपये द्वितीय येणाऱ्या गटाला 15 लाख रुपये व त्रितीय क्रमांक येणाऱ्या गटाला दहा लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातून प्रथम येणार्‍या गटाला एक लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे, या स्पर्धेत काम करण्यासाठी गावकऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे ते प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तालुका सातारा येथे दिल जाणार आहे. आणि त्या प्रशिक्षणासाठी बारामती तालुक्यातील गावकऱ्यांची पहीली बँच नुकतीच रवाना झाली आहे. या प्रशिक्षणासाठी काऱ्हाटी, नारोळी, पळशी, मुर्टी, जळगाव सुपे, चौधरवाडी, पानसरेवाडी, या गावचे गावकरी ट्रेनिंग साठी रवाना झाले. उरलेले गावांची पुढची बॅच 3 मे रोजी जाणार आहे, उरलेल्या इच्छुक गावांनी आत्ताच आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावं असे अवाहन तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड यांनी केले, यावेळी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गावकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनी यावेळी सांगितले पुढच्या काळामध्ये पानी फाउंडेशन स्पर्धेसाठी गावकऱ्यांना सोमेश्वर कारखान्यामार्फत मदत करू. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती पोपटकाका पानसरे , गणपत मामा गाडदरे , सहभागी गावांचे सरपंच पानी फाउंडेशन चे विभागीय समन्वयक आबा लाड तालुक समन्वयक पृथ्वीराज लाड तसेच विविध गावचे ग्रामस्त उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )