प्रतिनिधी – गोजूबावी येथील पंचशील मित्र मंडळाच्या वतीने दिनांक 11 एप्रिल रोजी मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न झाले यामध्ये इंलॕक्स बुद्राणी व उज्वल आरोग्य सेवा प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभले या डोळे तपासणी शिबिरात 80 लोकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली तर 10 लोकांना मोफत मोतीबिंदू साठी बुद्राणी हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात आले.
दिनांक 13 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 48 लोकांनी रक्तदान केले.रक्तदान शिबीर अक्षय ब्लड सेंटर -हडपसर पुणे यांच्या माध्यमातून घेण्यात आले.
दोन्ही विधायक उपक्रम गोजुबावीमध्ये पहिल्यांदाच राबविल्यामुळे पंचशील मित्र मंडळाचे गावक-यांनी कौतुक केले.
या दोन्ही कार्यक्रमासाठी पंचशील मित्र मंडळाचे अध्यक्ष साहिल भोसलेझ उपाध्यक्ष हरिश्चंद्र बगाडे, खजिनदार अभीजीत भोसले व नानासाहेब साळवे यांनी परिश्रम घेतले, तर यावेळी सचिन भोसले,अजय भोसले, विठ्ठल बागडे, प्रताप भोसले, रमेश आटोळे , ॲड काकासाहेब आटोळे,सत्यमेव पोलीस भरती अकॅडमी चे संचालक शरद नामदे , शरद सावंत, आप्पा हुंबे, याकुब शेख ,ग्रा सदस्य किशोर जाधव, हिराबाई जाधव
ग्रामपंचायत गोजूबावीच्या सरपंच माधुरीताई कदम आणि उपसरपंच दुर्गादास भोसले उपस्थित होते.