जळगांव सुपे ग्रामपंचायत मधील गावपुढाऱ्यांचे फोटो उतरवावे या मागणीला यश

प्रतिनिधी – शासकीय कार्यालय/ निमशासकीय कार्यालय/सभागृह/ शैक्षणिक संस्था इ. आणि शासनाने मान्य केलेल्या 24 मान्यवर/राजकीय, सामाजिक नेत्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही छायाचित्रे (फोटो) नियमानुसार लावता येत नाही व शासनाच्या मान्यतेशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात व सभागृहात शासनाचे वर नमूद आदेशात मान्य नेत्यांची चित्रे वगळता अन्य कोणतीही छायाचित्रे लावण्यात येऊ नयेत असा नियम असून सुद्धा ग्रामपंचायत जळगाव सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महापुरुषांबरोबर गावातील पुढाऱ्यांनी स्वतःचे फोटो लावून स्वतःचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला गावातीलच ग्रामस्थ, युवक वर्ग यांनी विरोध करून पंचायत समिती बारामती येथील गट विकास अधिकारी यांची भेट घेऊन रीतसर पत्र देवुन ते फोटो हटवण्यासाठी आग्रह धरून पत्रव्यवहार केला होता त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयात गावातील पुढाऱ्यांचे फोटो लावण्यास परवानगी नाही हे सांगून ग्रामपंचायत कार्यालय मधील फोटो काढण्यास गटविकास अधिकारी यांनी सांगितले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते कु. अमोल दत्तात्रय जगताप, व श्री. संदीप रमेश खंडाळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून ग्रामपंचायतीने त्या आदेशाची अंमलबजावणी केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *