बारामती दि.14: कृषी विभाग आणि इंदापुर येथील महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर येथे द्राक्ष, डाळिंब व पेरू बागेबाबत चर्चासत्राचे आयोजन येथे करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजय उपाध्याय, डॉ. बिपेन यादव, सोलापूर येथील डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉ. आर. ए. मराठे तसेच पेरूबाबत कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरचे डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे आदी शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
इंदापूर तालुक्यातील बागायतदार शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी सेवा केंद्रचालकांनी या विनामूल्य चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.