भाग – १५ खानाखजाना या आजच्या सदरामध्ये आपण पाहणार आहोत मेथी मटर मलाई…
साहित्य- 100 ग्रा. हिरवे मटर, 2 चमचे मलाई, 2 छोटे जुडी मेथी, 4 हिरवी मिरची, एक टोमॅटो, 2 चमचे साखर, 2 चमचे मावा, 1 कप दूध, 4 चमचे वाटलेला पालक, थोडी हळद, 200 ग्रा. काजू, 50 ग्रा. खरबुजे बी. 2 कारले, 4 चमचे तेल, 100 ग्रा. मावा, 4 लवंग, 4 छोटी विलायची, 4 काळे मिरे, 2 तेज पान, 2 चमचे अदरक लसणाची पेस्ट.
पद्धत -1 लीटर पाण्यात काजू आणि खरबूज बी मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावी. काढईत तेल टाकून लवंग, विलाईची, तेजपान, काळी मिरे आणि अदरक लसणाची पेस्ट टाकून भाजावे यात मावा टाकून व्यवस्थित मिळवावे. 1 ग्लास पाणी, काजू-खरबूज पेस्ट आणी एक कप दूध टाकावे. 10-15 मिनिटे परतून शिजवावे म्हणजे मिश्रण फाटणार नाही चांगल्या तऱ्हेने उकळल्यावर चवीनुसार त्यात मीठ टाकावे आता कमी गॅस करून अर्धा तास शिजवावे काजू ग्रेवी तयार आहे. हिरवे मटर व मेथीची पाने तोडून उकळावे थंड झाल्यावर त्यास पिळून घ्यावे आता या मिश्रणात काजू ग्रेवी टाकावी यात थोडीशी हळद, पालक, मेथी, हरी मटर, मलाई, टमाटर, हिरवी मिरची टाकून चांगल्याप्रकारे मिसळावी. 5 – 10 मिनिट शिजवावे 2 चमचे क्रीम टाकावे. डिशमध्ये ठेवून क्रीम आणि कारल्याच्या तुकड्यांनी सजवावे.
माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर
(महिला प्रतिनिधी)