श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज येथे महिला दिन साजरा

श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज येथे महिला दिन साजरा

प्रतिनिधी – श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, बारामती येथे ८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनी यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षकांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री तावरे जी.आर यांनी केले, त्यांनी प्रास्ताविकामध्ये स्त्रियांविषयी आपले मत व्यक्त करताना भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच स्त्रियांना मानाचे स्थान आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते म्हणून आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे या प्रकारे आपले विचार व्यक्त केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती भंडलकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री पवार बी.एन. यांनी स्त्रियांचे कर्तृत्व आणि मिळाले हक्क यांची जाणीव आपणास सर्वांना असायला हवी, महिला दिन सादर करण्यामागे महिलांचे सबलीकरण करणे हा हेतू आहे. प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यामध्ये विविध प्रकारच्या भूमिका अतिशय प्रामाणिकपणे निभावत असतात आणि म्हणून आपण प्रत्येक स्त्रीचा एक आई, मुलगी, बहिण, आपली सहकारी म्हणून तिचा सन्मान केला पाहिजे अशाप्रकारे आपले विचार व्यक्त करून त्यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री. पवार बी.एन ,पर्यवेक्षक श्री साळुंके ए.एस., ज्येष्ठ शिक्षक श्री तावरे जी.आर. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तावरे जी.एम. यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे उपशिक्षक श्री गोळे आर.व्ही. यांनी मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )