महिलांना सन्मानाची वागणूक देण्याची गरज – तहसिलदार विजय पाटील

बारामती दि. 8 : महिला ह्या समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांना सन्मानाची वागणूक देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तहसिलदार विजय पाटील यांनी केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येथील प्रशासकीय भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या कृषी सल्लागार शुभांगी जाधव, नायब तहसिलदार पी.डी.शिंदे व महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या.

श्री. पाटील म्हणाले, महिला ह्या समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांना सन्मानाची वागणूक देण्याची गरज आहे. महिलांना 50 टक्के आरक्षण दिल्यामुळे समाजामध्ये महिलाशक्ती पुढे येत असून सकारात्मक बदल दिसून येत आहेत. स्त्री प्रकृतीनेच सहनशील आणि कणखर असल्यामुळे पुरूषांच्या तुलनेत श्रेष्ठ राहिल्याचे दिसून येते. देशात स्त्री जन्मदर वाढत असल्याबाबत समाधान व्यक्त करुन त्यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

श्रीमती बांदल म्हणाल्या, आजची स्त्री ही पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे. स्त्रीला लिंगभेदामुळे समान संधीपासून दूर ठेवले जाऊ नये यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीनेच या वर्षीच्या महिला दिनाची संकल्पना ‘पूर्वाग्रह खंडीत करा’ अशी आहे.

नायब तहसिलदार श्रीमती शिंदे म्हणाल्या, जागतिक महिला दिनानिमित्त जास्तीत जास्त महिलांनी मतदार नाव नोंदणी करुन आपले मत अनमोल असते हे दाखवून द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *