बारामती (दि:२७) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बारामतीतील होलार समाजाचे युवा नेते सेवक अहिवळे यांना नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेकडून फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई, छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास महाराज या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी एन.डी.एम.जे चे राज्य महासचिव अॅड केवल उके, राज्य सचिव वैभव गिते, ज्येष्ठ नेते विकास धाईंजे, अॅड सुमित सावंत यांच्या हस्ते सेवक अहिवळे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस ही एक सामाजिक संघटना असून अन्याय, अत्याचाराच्या विरोधात बंड करुन पिडीतांना न्याय मिळवून देणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांचे विचार आपल्या खास शैलीने समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ही संघटना करीत आहे. आणि कार्यामुळेच अल्पावधितच संघटनेला समाजात लोकप्रियता मिळालेली आहे. एक चळवळ म्हणून महाराष्ट्रामध्ये नॅशनल दलित मूव्हमेंट फॉरजस्टीस कडे पाहिले जाते.
आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अॅड संजय नवगिरे, अॅड वैभव धाईंजे, रोहीत एकमल्ली, हनुमंत केंगार, नितीन काळे, विशाल गेजगे,परमेश्वर जावीर, परमेश्वर गेजगे, बबन नवगिरे, अनिल नवगिरे, सचिन काळे, संजय नवगिरे ,धनाजी शिवपालक,
नवनाथ गेजगे या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.