प्रतिनिधी – दौंड तालुक्यातील खडकी गावामध्ये छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 19 फेब्रुवारी रोजी नेञ तपासणी, भव्य क्रिकेट स्पर्धाचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रम, आयोजित करण्यात आले होते. तसेच 20 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होते. त्यावेळी 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्या मध्ये काही महिलांनी रक्तदान केले आहे. त्या दरम्यान कोविड काळात रांञदिवसा कोरोना संपुष्ठात आणण्यासाठी खडकी गावातील सर्व डाॅक्टर, औषध विक्रेते, मराठा सहकार्य समूह मधील सर्व सदस्य व खडकी गावातील युवा कोविड योद्धांचे ” कोविड योद्धा सन्मान ” देवून गौरवण्यात आले. शिबिर दरम्यान बारामती मधील महालक्ष्मी उद्योग समूह च्या वतीने रोड सेफ्टी व चिल्डन सेफ्टी या विषयावर सेमिनार व स्वयंभू हाॅस्पिटल च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर आयोजित केलं होते. या कार्यक्रमप्रसंगी पाटस सहकारी साखर कारखान्याचे संचालक महेश शितोळे, खडकी गावचे संरपच स्नेहल काळभोर, उपसरपंच राहूल गुणवरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन काळभोर , गणेश काकडे, नितीन काळे, अभिजीत जगताप, विकास काळे, हनुमंत काळभोर, गणेश गुणवरे, संतोष काळे, राहूल काळे, यांनी विशेषत्वाने सहभाग होता.