विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त NSS च्या माध्यमातून विविध सामाजिक कामे…

विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त NSS च्या माध्यमातून विविध सामाजिक कामे…

प्रतिनिधी : दिपक वाबळे देऊळगाव रसाळ , बुधवार दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजी मौजे नारोळी येथे विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पाणी फाऊंडेशनचे मा. श्री. पृथ्वीराज लाड साहेब व सुपे इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य योगेश पाटील सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल पाटील सर, इंग्लिश स्कूलचे संतोष कोंडे सर आणि मुख्याध्यापक हनुमंत ढमे सर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या समारोपाच्या व्यासपीठावर मौजे नारोळी गावच्या सरपंच मोनाली संदीप भंडलकर उपसरपंच दत्तात्रय मारुती ढमे ग्रामपंचायत सदस्य श्री प्रदीप गोसावी अक्षय कोंडे बाळासाहेब ढमे संभाजी ढमे ज्ञानदेव सोनवणे त्याचबरोबर भारत किशन ढमे (माजी मेजर सैनिक) ग्रामसेविका सौ. दिपाली हिरवे मॅडम पोलीस पाटील , सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री वाबळे सर , नवनाथ ढमे , संतोष कोंडे सर , हनुमंत ढमे , सर सामाजिक कार्यकर्ते सुमित ढमे , चंद्रकांत ढमे , निखिल ढमे , सुमित ढमे व ग्रामस्थ इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रिय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीरातील सात दिवसा पासून सुरू झालेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी/ विद्यार्थ्यांनी , रसेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रामदास गांगुर्डे यांनी सरांच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थ्यानी या सात दिवसात मौजे नारोळी ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीतील गार्डन , तसेच प्राथमिक शाळा परिसरातील वृक्षांना आळी बनवली त्याचबरोबर शाळे लगत असणारी खड्डे विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सपाट केली. त्यानंतर तुकाई मंदिर आणि तुकाई मंदिरासमोरील गार्डन मधील सर्व झाडांना आळी बनवणवून त्या सर्व झाडांना पाणी देण्याच्या ठिबक पाइप पसरवून पाणी व्यवस्था करण्यात आली.

मौजे नारोळी गावातील स्मशानभूमीमध्ये मोकळ्या जागेवर दोनशेहून अधिक झाडे लावण्यात आली. त्याच बरोबर भंडलकर वस्ती ते गावचा मुख्य रस्त्यालगत दोनशे झाडी विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून लावण्यात आली. गावातील लोकाना कोरोणा मुक्तीचा संदेश विद्यार्थ्यानी प्रभात फेरी काढून दिला.

तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अंधश्रद्धा निर्मुलन नाटक सादर केले. गीत गायले विद्यार्थ्यानी त्यांचें मनोगत व्यक्त केल. कार्यक्रमाच्या समारोपाचे सूत्र संचालन कु. जगताप पूनम तर आभार प्रदर्शन कु. नेहा ढमे विद्यार्थिनिनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )