प्रतिनिधी : दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ , बारामती
मंगळवारी 15 फेब्रुवारी 2022
राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून रोजगार हमी योजना राबवली जाते या योजनांतर्गत विविध विकास कामे मार्गी लावले जातात राज्य शासनाच्या रोजगार हमी योजने च्या समितीच्या माध्यमातून कामावर देखरेख तसेच प्रस्ताव तयार करणे आधी कामे केली जातात.
या अगोदर राहुल वाबळे हे बारामती तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेस बारामती तालुका अध्यक्ष म्हणून गेली सहा वर्षे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत तसेच बारामती तालुक्यातील प्रमुख गावांपैकी एक ग्रामपंचायत म्हणून देऊळगाव रसाळ ची ओळख आहे या ग्रामपंचायतीवर राहुल वाबळे यांनी गेली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजितदादांच्या नेतृत्वात सलग तीन पंचवार्षिक या युवकाच्या हातात निर्विवाद वर्चस्व आहे म्हणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि सर्वसामान्य तळागाळातील व्यक्तीबरोबर त्यांची जोडलेली नाळ पाहता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी ही निवड केली आहे
बारामती तालुका रोजगार हमी योजना समितीच्या अध्यक्षपदी राहुल वाबळे यांची निवड करण्याची शिफारस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली होती त्यानुसार राहुल वाबळे यांना अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे या पदाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकोपयोगी कामे करण्यावर संभाजी नाना होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भर देणार असल्याचे राहुल वाबळे यांनी निवडीनंतर सांगितले.