प्रतिनिधी – मुरटी, ता. बारामती जि.पुणे येथील नीरा-मोरगाव रोडवर असलेल्या टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन दि. 16/01/2022 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेऊन एकूण 4,11,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. सदर बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाकडून चालु होता. सदर पथकात सपोनि सचिन काळे, सपोनि संदीप येळे, सहा.फौजदार तुषार पंदारे, पोहवा रविराज कोकरे, पोहवा. जनार्दन शेळके, पोहवा. राजु मोमीण, पोहवा. अजित भुजबळ, पोहवा अभिजित एकशिंगे, पोना. मंगेश थिगळे, पोना स्वप्नील अहिवळे, पोना. योगेश नागरगोजे, यांना नेमले होते. त्याचप्रमाणे तपासा दरम्यान वडगाव निंबाळकर पो स्टे चे सपोनि सोमनाथ लांडे, पोसई गणेश कवितके,पोकॉ अमोल भुजबळ यांचेपथकाने देखील तपास पथकाला मदत करत गुन्ह्यामध्ये पांढरे रंगाचे बोलेरो चारचाकी वाहनाचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले होते . बोलेरो गाडीचा मागोवा घेत रोडवरील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यास सुरूवात केली, फुटेज च्या आधारावर बोलेरो गाडीची काही ठळक वैशिष्ठ्ये शोधून रस्त्यांवरील सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करत बोलेरो गाडी ही कारेगाव ता शिरूर जि पुणे परिसरात आल्याचे दिसून आले. तपास पथकाने सूत्रे हालवत, रांजणगाव MIDC पो स्टे चे पोनि मांडगे सो,यांचे मदतीने कारेगाव परिसरात पांढरे बोलरोचा शोध सुरू केला त्या दरम्यान तपास पथकाला गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील एटीएम चोरीतील आरोपी बनवारीलाल मीना हा त्याचा मित्र बाबूलाल उर्फ पप्पू चौधरी याचे सोबत गुन्हयातील संशयित बोलेरो गाडीचा वापर करत आहेत. अशी बातमी मिळाल्याने दि. 02/02/2022 रोजी कारेगाव परिसरात सापळा लावला असता ते दोघे बोलेरो वाहनास मिळून आले. त्यांचे कडे चौकशी केली असता, त्यांचा सदर गुन्हयात सहभाग असलेचे निष्पन्न झाले. त्यांचे कडे अधिक चौकशी करता त्यांनी बोलेरो गाडीचा वापर करून जवळा ता पारनेर जि अहमदनगर येथील एटीएम मशीन चोरी केले असल्याचे सांगितले असून बोलेरो गाडीची कागदपत्रे त्यांचे जवळ उपलब्ध नसल्याने गाडीची माहिती घेतली असता तोफखाना पो स्टे येथे सदरची बोलेरो गाडी चोरी गेलेबाबत फिर्याद दाखल असल्याचे समजले आहे. सदर आरोपी यांनी लोणी व्यंकनाथ परिसरात पिकअप गाडीचा वापर करून एटीएम चोरण्याचा प्रयत्न केला असून नगर-मनमाड रोडवरील गरवारे चौक परिसरात देखील पिकअप गाडीचा वापर करून एटीएम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न केला असून त्यावेळी त्याठिकाणी पिकअप गाडी सोडणेत आली असल्याचे आरोपींनी सांगितले आहे.
आरोपी 1) बनवारीलाल उर्फ राजू मोहनलाल मीना, वय 34 वर्षे, व्यवसाय रॉयल हॉटेल, सध्या रा. कारेगाव ता शिरूर जि पुणे, मूळ रा. पाचार ता दातारामगड, जि सिखर राज्य राजस्थान, 2) बाबूलाल उर्फ पप्पू गोपाळ चौधरी, वय 30 वर्षे, सध्या रा, कारेगाव रॉयल हॉटेल, ता शिरूर जि पुणे, मूळ रा करड, ता दातारामगड,जि सिखर, राज्य राजस्थान यांचेकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक मा. मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक शेळके, सपोनि सचिन काळे, सपोनि संदीप येळे, सहा फौजदार तुषार पंधारे, पोहवा रविराज कोकरे, पोहवा जनार्दन शेळके, पोहवा राजू मोमीन , पोहवा अजित भुजबळ, पोहवा अभिजीत एकशिंगे, पोना मंगेश थिगळे , पोना स्वप्नील अहिवळे, पोना योगेश नागरगोजे, वडगाव निंबाळकर पो स्टे चे सपोनि सोमनाथ लांडे, पोसई गणेश कवितके, पो कॉ अमोल भुजबळ, यांनी केली आहे.
ATM चोरीचे उघडकीस आलेले गुन्हे.
1) वडगाव निंबाळकर, पुणे ग्रा. पो स्टे गु र नं, 19/2022 IPC 380
2) पारनेर, पो स्टे अहमदनगर गु र नं, 918/2021 IPC 379, 427
3) तोफखाना, पो स्टे अहमदनगर गु र नं, 1080/2021 IPC 379
4) श्रीगोंदा पो स्टे, अहमदनगर गु र नं 768/2021 IPC 379, 511
5) नगर MIDC, पो स्टे अहमदनगर गु र नं, 735/2021 IPC 380,511