बारामती: प्रजासत्ताक दिनानिमित्त संजय गांधी योजना समितीची संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ राज्य वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी निवड सभा गुरुवार (दि.२८ जाने.२०२२) रोजी सकाळी ११:०० वाजता प्रशासकीय भवन,तहसील कार्यालय बारामती याठिकाणी संपन्न झाली.
ही सभा संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सदर सभा समिती सदस्य सुनिल संजय बनसोडे, शिवराम सिद्धू माने,शहाजी ज्ञानदेव दळवी,निलेश विलास मदने,नुसरत दिदार इनामदार,जीवना रणधीर मोरे, प्रविण शरद गालिंदे आणि शासकीय सदस्य नायब तहसीलदार माधवराव भोसले तसेच अव्वल कारकून सुरेश जराड व मदतनीस तृप्ती घोडके आदींच्या उपस्थितीत सभा पार पडली.
या सभेमध्ये संजय गांधी योजना १६७ प्राप्त अर्जांपैकी मंजूर १५९ व नामंजूर ८, श्रावणबाळ योजना ७४ अर्जांपैकी ६० मंजूर व १४ नामंजूर इंदिरा गांधी योजना ११ पैकी सर्व ११ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
सर्व प्रकारतील एकूण २५२ प्राप्त अर्जांपैकी २३० अर्ज सर्वानुमते मंजूर करण्यात आले व नियम आणि अटीनुसार २२ अर्ज नामंजूर करण्यात आले.
बारामती तालुका व शहरातील गरजू आणि पात्र दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, पस्तीस वर्षावरील अविवाहित, घटस्फोटीत व घटस्फोट प्रक्रियेतील महिला तसेच ६५ वर्षावरील वयोवृद्ध निराधार स्त्री व पुरुष आदींनी संजय गांधी, श्रावणबाळ व इंदिरागांधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संजय गांधी योजनेचे अध्यक्ष धनवान वदक यांनी केले.