माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे)- पाहुणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री भगवान दत्तात्रय तावरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्याची बिनविरोध निवड करण्यात आली.
पाहुणेवाडी गावच्या सरपंच सौ.पौणिमा (विभावरी ) सचिन यादव यांनी राजीनामा दिल्यापासून पद रिक्त होते . रिक्त सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आर .डी .पारधी. यांनी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलाविली होती . यावेळी सरपंच पदासाठी श्री भगवान दत्तात्रय तावरे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे निवडणूक अधिकारी आर .डी .पारधी. व तलाठी अमोल मारगळ यांनी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली .सभेचे संयोजन ग्रामसेवक चव्हाण. ए .एल .यांनी केले. सर्व सदस्यच्या उपस्थितीत त्यांची सरपंच पदी निवड करण्यात आली.
सरपंचपदी निवड होताच त्यांनी त्यामध्ये भगवानराव तावरे यांनी गावासाठी त्यांच्या मुलांनी जिजी स्वप्ने पहिली होती ती अपूर्ण स्वप्न राहिली असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू असे सरपंचाने सांगितले . यावेळी पाहुणेवाडी गावातील ग्रामस्थ ऍड .विजयराव गोपाळराव तावरे . जयराम तावरे.महादेव भंडलकर .राजेंद्र ताकवले .कल्याण कदम. सचिन यादव .महादेव ढवळे.आनंता तावरे. भिमदेव तावरे . पिंकु जाधव. उमेश परकाळे. संदीप इंगळे .विशाल शिंदे .शुभम तावरे. गणेश तावरे. उपस्थित राहून नविन सरपंच पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.