नगरपंचायतची स्वतःची नवीन स्वतंत्र शासकीय इमारत बांधा.

(नागरी समस्या संघर्ष समितीची मागणी)

बारामती (प्रतिनिधी, गणेश तावरे) स्थानिक नगरपंचायत ची निर्मिती मागील सहा वर्षांपूर्वी झालेली आहे. परंतु अजूनही नगरपंचायत चा प्रशासकीय कामकाज छोट्याशा जागेत आणि भाड्याच्या जुन्या खाजगी इमारतीमध्ये चालू आहे. काळाची पावले उचलताच नगरपंचायत चे स्वतंत्र शासकीय प्रशस्त नगर विकास भवन निर्माण करा अशी मागणी निवेदनाद्वारे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये सहा वर्षांपूर्वी रूपांतर झाले. परंतु कारभार मात्र भाड्याच्या जुन्या जीर्ण इमारती मध्येच चालू आहे. संसद भवनाचे सेंट्रल विस्टा बनू शकते, वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालय जुने झाले म्हणून ते पाडून नवीन इमारत बनू शकते. तर कारंजा येथील नागरिकांकरिता नगरपंचायतचे नगरभवन हे भाड्याचे जुने आणि जीर्ण का ? स्थानिक शासन संस्थेचे स्वतंत्र शासकीय प्रशस्त नगरविकास भवन नको का ? असा प्रश्न नागरी समितीने निवेदनातून व्यक्त केला आहे.
कारंजा शहराच्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून, कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट चे दृष्टिकोनातून, कार्यालयामध्ये असणारे सभागृह वेगवेगळे स्वतंत्र कक्ष स्वतंत्र पार्किंग आणि नागरिकांना मिळणाऱ्या अद्यावत सेवा सुविधांच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये नगरपंचायतची स्वतःच्या मालकीची स्वतंत्र शासकीय प्रशस्त नगरविकास भवन स्वरूपाची इमारत असणे अतिशय आवश्यक आहे.
नगरपंचायत प्रशासनाने सुसज्ज इमारत बांधण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करावा आणि प्रशस्त असे नगरपंचायत चे कार्यालय उभारावे अशी मागणी निवेदनाद्वारे नगरपंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी किशोर साळवे यांचेकडे केली. निवेदनाच्या प्रती नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री
सुनीलजी केदार, जिल्हाधिकारी वर्धा व आजी-माजी लोकप्रतिनिधी आमदार यांना पाठविल्या आहेत. निवेदन देतेवेळी नागरी समितीचे असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *