बारामती: (२४ जाने.२०२२ रोजी)
उपमुख्यमंत्री अजित पवार व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या माध्यमातून बारामती व लोकसभा मतदारसंघातील बारावी उत्तीर्ण पात्र व गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत म्हणून प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे धनादेश असे एकूण २ लाख,८२हजार,८६० रुपयांच्या शिष्यवृत्ती धनादेशाचे
वाटप तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप,बारामती खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव टेंगले,बारामती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक,सोमेश्वर सह.सा.कारखान्याचे संचालक राजवर्धन शिंदे, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती अनिल खलाटे,मा.उपसभापती विठ्ठल खैरे,दूध संघाचे संचालक प्रकाश तावरे, आप्पा शेळके आदींच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती याठिकाणी करण्यात आले.
दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मार्फत गुणवंत व गरजू विध्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते.
यावेळी तालुका राष्ट्रवादी सोशल मीडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे, सुप्रियाताई सुळे यांचे खाजगी सचिव नितीन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा बारामतीचे सचिव नितीन काकडे,बारामती यशस्विनी अभियान सहसमन्वयिका दिपाली पवार,निलेश जगताप आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.