प्रतिनिधी : दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ , दिनांक 23 जानेवारी 2022 रविवार रोजी हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा स्मृतीदिन व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती यानिमित्ताने दोन्ही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राजक्ता मतिमंद निवासी शाळा सुपे या ठिकाणी करण्यात आले होते. यानिमित्ताने याप्रसंगी मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड , बारामती तालुका , स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा , राजे प्रतिष्ठान बारामती , निसर्ग स्पर्श फाऊंडेशन सुपे , छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती सुपे परगणा. ग्रामस्थां कडुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री निलेश पानसरे , सहअध्यक्ष शिवश्री अतुल ढम , महेश चांदगुडे सर , मुनिर डफेडार ग्रामपंचायत सदस्य सुपे , फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष गणेश खैरे , जीवन साधना फाउंडेशन अध्यक्ष जयराम आप्पा सुपेकर , एकल शिक्षक मंच शरद मचाले सर , सुपे ग्रामस्थ सर्व संघटनांचे पदाधिकारी व सुपे परगण्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश चांदगुडे सर यांनी केले व माध्यमातुन शहाजी राजे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम करण्यात आले. विलास वाघचौरे याने गारद दिली , आभार प्रदर्शन जीवन साधना फाउंडेशनचे अध्यक्ष जयराम अप्पा सुपेकर यांनी शहाजीराजे विषयी माहिती देऊन आभार मानले. यावेळी कोरोना सुरक्षाविषयक सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.