भुईमुग बियाणेकरीता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २१ :- उन्हाळी हंगामात ग्राम बिजोत्पादन या योजनेसाठी भुईमुग बियाणाकरीता महाडीबीटी पोर्टलवर 28 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

योजनेसाठी विहीत मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतक-यांचाच विचार करण्यात येणार आहे. योजना ३ वर्षाकरीता राहील. प्रथम वर्षी एक तृतीयांश गावांची निवड करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षात तालुक्यातील सर्व गावामध्ये ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम टप्याटप्याने राबविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. या पद्धतीने निवड केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यास १ एकर क्षेत्र मर्यादेत निवड केलेल्या गावालगत महाबीजच्या अधिकृत विक्रेत्यामार्फत संबंधित पिकाचे प्रमाणीत बियाणे परवानगीवर अनुदानित दराने वितरण करण्यात येणार आहे.

कृषि विभागाकडील “महाडीबीटी फार्मर” (MahaDBT Farmer) नावाचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्यावे. सुविधा ही वापरकर्ता आय.डी. व आधार क्रमांक आधारीत असल्याने एकाच गावातून स्मार्ट मोबाइल असणाऱ्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करुन कागदपत्रे अपलोड करावयाची आहे. याकरीता जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घ्यावी तसेच यामध्ये कोणतेही तांत्रिक अडचण असल्यास [email protected] या ईमेलवर अथवा ०२०-२५५११४७९ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *