प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर यांनी दिले निवेदन
बारामती: काँग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांनी
जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात असताना, भंडारा जिल्हयातील नागरिकांनी मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत त्यांच्याकडे तक्रारी केल्या. यावेळी नागरिकांशी बोलत असताना प्रदेशध्यक्ष पटोले हे स्थनिक गुंड मोदीला आपण शिव्या देऊ शकतो. मारू शकतो असे म्हटले होते.
मात्र या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करून त्याचा पंतप्रधान मोदींशी संबंध जोडत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मा. प्रांताध्यक्षांनी स्वता:या बाबतीत स्पष्टपणे खुलासा करून आपण
स्थानिक गुंड मोदीबाबत बोलत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबत नाही असे सांगितले आहे.
तरीही राज्यातील भाजपचे नेते जाणिवपुर्वक स्थानिक गावगुंड मोदीबाबत केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधानांचा संबंध जोडून पंतप्रधान पदाचा अपमान करत आहे. ही अत्यंत गंभीर
बाब आहे. असत्य कथन करून लोकांची दिशाभूल करणे, पंतप्रधानपदाचा अवमान करणे हा दखलपात्र गुन्हा असून यासाठी भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रोहित बनकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
तसेच अमरावतीचे मा.कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी प्रदेशध्याक्ष नानाभाऊ पटोले यांच्याबद्दल असभ्य वकत्व्य केले त्याचा आम्ही निषेध करतो व त्यांना त्वरीत अटक करण्याची मागणी करीत आहे. व डॉ. अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.असे रोहित बनकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष ओबीसी विभाग यांनी म्हटले आहे