अखिल भारतीय ओबिसी सेवा संघाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी अभिजित भिमराव काळे यांची निवड

प्रतिनिधी- बारामती येथे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पदी श्री. अभिजित भिमराव काळे मा. नगरसेवक यांना महाराष्ट्र राज्याचे युवक प्रदेश अध्यक्ष श्री.किशोर मासाळ यांचे वतिने नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तात्यासाहेब देडे, युवकचे कार्याध्यक्ष श्री. सचिन शाहीर, सचिव श्री. भारत भोंग तसेच मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. पुढील काळात ओबिसीच्या योजना आणी आरक्षण लढ्यात होत असणारी समाजाची पिळवणूक थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिजीत काळे यांनी जाहीर केले. ओबिसी सेवा संघाचे काम पाच राज्यात चालु असुन येणार्या काळात महाराष्ट्रात संघटना मजबुतीकरण सुरु असुन सुप्रीम कोर्ट आणी राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी ओबीसींचे फरपट थांबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ व्यक्त केले . बारामती येथे बारामती क्लब या ठिकाणी ओबीसी सेवा संघाची महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळेस सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पद अभिजीत काळे यांना देण्याचे एकमताने ठरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *