बारामती (प्रतिनिधी गणेश तावरे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा घा. येथे 16 जानेवारी 22 ला जिजाबाई आणि सावित्रीबाई यांची संयुक्त जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला .या कार्यक्रमांमध्ये संगीता पाटील दिग्दर्शित “सावित्रीबाई फुले यांचा शैक्षणिक संघर्ष ‘ या महान सामाजिक नाट्य प्रयोगातून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले या दाम्पत्यांनी स्त्रियांसाठी तसेच समाजासाठी केलेला त्याग व शैक्षणिक संघर्ष करताना काय हालअपेष्टा सोसाव्या लागल्या याचे ज्वलंत उदाहरण या नाट्य प्रयोगातून सादर करण्यात आले .आज बहुजन समाज फुले दांपत्याच्या त्यागामुळे शिक्षण क्षेत्रात प्रगतीशील झाला.याचे सादरीकरण नाट्य प्रयोगाद्वारे करून दाखविण्यात आले .
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा धम्ममित्र रेखा गवई, कार्यक्रमाच्या उद्घाटक संभाजी ब्रिगेडच्या सचिव शिवमती गीता कळस्कर, प्रमुख पाहुणे धम्म सहाय्यक कांचन गजभिये, संघर्ष समितीचे सदस्य विनोद चाफले ,बामसेफ वर्कर लक्ष्मण वाळके, धम्म मित्र सदाशिव मनोहरे, विठ्ठल टेकडी देवस्थानचे अध्यक्ष ताराचंद चाफले हे विचार मंचावर उपस्थित होते .
वरील सर्वांनी प्रसंगानुरूप विचार व्यक्त करून आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्म मित्र मंदा नागले यांनी केले. प्रास्ताविक शिवमती अनिता शेटे यांनी केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे कार्यवाह अशोक नागले यांनी उपस्थित पाहुण्यांचे व प्रेक्षकांचे आभार मानले .कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवश्री पियुष रेवतकर,विनोद पाटील, धम्ममित्र जी.आर .गवई, श्रीराम इंगळे, शिवश्री उमेश पाचपोर ,शिवश्री राजेंद्र इंगळे, शिवश्री मनोज वानखडे ,शिवश्री दशरथ डांगोरे, धम्म मित्र शीला विघ्ने, धम्म मित्र रमेश मनवर, शीलवंत ठाकरे ,लालचंद सोनटक्के, वनमाला माहुरे ,अनिता कांबळे ,शुभांगी दुपारे, दुर्गा कांबळे ,विजय कांबळे, रंजना मुंदाने, सोवेरा पाटील, दीप गजभिये ,प्रा. किरण भुयार, शिवश्री विनोद दंडारे, निष्कर्ष नागले आणि राऊत मॅडम यांनी परिश्रम घेतले.