विद्याप्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती ‘निमित्त पोषण कि पोटली’ पोषण अभियानाची सुरुवात

दिनांक १२- जानेवारी, रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पणदरे मध्ये महिलांच्या गरोदरपणातील आवश्यक तपासण्या, आणि पोषण आहार याविषयी तेथील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
वसुंधरा वाहिनी बारामती, युनिसेफ आणि SMART संस्था दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पोषण कि पोटली’ – या अभियाना अंतर्गत जनजागृतीसाठी माता बाल पोषण अभियान राबवले जात आहे. कार्यक्रमासाठी पणदरे ग्रामपंचायतमधील सरपंच सौ.मीनाक्षी जगताप, आरोग्य सहाय्यक धनंजय वाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र पणदरे मेडिकल ऑफिसर. डॉ. तेजस्विनी कोकरे, आरोग्य सेविका शालन कोकरे आशा सेविका अंजली खजिनदार, रेखा कांबळे, अश्विनी गायकवाड, विद्या मोरे, बानूबाई कुंभार, यांनी कार्यक्रमात पोषणाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला गर्भवती माता उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तसेच महिला व बालकल्याण चे श्री. अभिमन्यू माने यांचे सहकार्य लाभले.
मुलाचं सामर्थ्य आणि क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी पोषण महत्वाच असल्याच विद्याप्रतिष्ठानच्या विश्वत आदरणीय सौ. सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅडवोकेट अशोक प्रभुणे, सचिव अॅडवोकेट निलिमाताई गुजर, खजिनदार श्री युगेन्द्र पवार, तसेच व्ही.आय. आय.टी चे संचालक डॉ. आनंद देशमुख यांनी या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले.
मुलांमधील मृत्यू दर कमी करण कुपोषणाला प्रतिबंध करून मातांना पौष्टिक आहारा विषयी मनोरंजनातून मार्गदर्शन करण हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे वसुंधरा वाहिनीच्या केंद्र प्रमुख सौ. आशा नारायण मोरे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर.जे. स्नेहल कदम व ऋतुजा आगम यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *