आरोग्य मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती मधील महिला हॉस्पिटल येथील रुग्णांना फळ वाटप

आरोग्य मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती मधील महिला हॉस्पिटल येथील रुग्णांना फळ वाटप

प्रतिनिधी – कोरोणाची परिस्थिती पुन्हा उद्भवू लागली असल्याने शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करा असे वारंवार सांगितले जात आहे. सामाजिक, धार्मिक, कार्यक्रम, लग्नसोहळे, वाढदिवस मर्यादित स्वरूपात करून सगळ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे नेहमीच करत असताना दिसून येत आहे. त्यांचा वाढदिवस देखील कार्यकर्त्यांनी असाच साजरा केला आहे. आज बारामतीमधील महिला शासकीय रुग्णालय येथील महिलांना फळांचे वाटप केले गेले. खऱ्या अर्थाने आरोग्यमंत्री यांचा वाढदिवस विधायक पद्धतीने सामाजिक कार्य करून साजरा केल्यामुळे सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. मा.ना.श्री राजेशभैया टोपे ( आरोग्य मंञी, महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक मा श्री तुषार भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून आयोजनाने बारामती महिला हाॅस्पिटल मधील सर्व महिलांना वाढदिवसानिमित्त फळे वाटत करण्यात आले. या वेळी ङाॅ बापु भोई स्ञी आरोग्य तज्ञ वैद्यकिय अधिकारी, हरिभाऊ आटोळे, संतोष घोडे, प्रमोद बोराटे, तुषार भाऊ शिंदे युवा मच आणि महिला स्टाफ, महिला हाॅस्पिटल बारामती यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )