बारामती (प्रतिनिधी गणेश तावरे ) – गोरेगाव (वांगी) गावचे सुपूत्र व स्व.आनंद दिघे साहेबांवरती निष्ठा असणारे खटाव तालुका शिवसेना नेते मा.लक्ष्मण शिंदे (तात्या) व त्यांच्या पत्नी गोरेगाव(वांगी) ग्रामपंचायत सदस्या, सातारा जिल्हा शिवसेना महिला आघाडी जिल्हा उप स़ंघटिका, दक्ष नागरिक फाऊंडेशन पोलीस मित्र सातारा जिल्हा महिला अध्यक्षा मा.हेमलता शिंदे(काकी) यांनी महात्मा गांधी विद्यालय पुसेसावळी व जयराम स्वामी विद्यामंदिर वडगाव(ज.स्वा) तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेगाव(वांगी) येथील शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना लक्ष्मण शिंदे(तात्या) म्हणाले की आम्ही बारावीला 90% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील सर्व शैक्षणिक जबाबदारी घेवु, महिलांच्या सक्षमीकरण, सबलिकरणा बरोबर च महिला युली मध्ये शौर्य तयार व्हावं या साठी मुली महिलांनी तयारी करावी असे सौ हेमलता शिंदे काकी नी मत मांडले व हिम्मतराव माने (बापू) यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आहे ते म्हणाले की विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यावेळी वेताळ भक्त दादा महाराज, सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मा.हिम्मतराव माने(बापू) सरपंच,शुभांगी जाधव उपसरपंच, श्रीकांत माने ग्रामपंचायत सदस्य, आनंदराव कदम, गणेश दळवी, अनिल भाग्यवंत, रंजना कदम तसेच पंढरीनाथ भाग्यवंत, बजरंग कदम(नाना), पंढरीनाथ भाग्यवंत, महादेव शिंदे बापु,सौ सुनंदा धनाजी शिंदे गोरेगाव वांगी शिवसेना शाखा महिला शाखा संघटिका समस्थ गोरेगाव(वांगी) ग्रामस्थ उपस्थित होते.