अन्नसुरक्षा अभियानांतर्गत तृणधान्य विकास कार्यक्रम रब्बी ज्वारी प्रकल्पातील शेतीदिन व शास्त्रज्ञ भेट कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी- आज दिनांक 08/01/2022 रोजी मौजे- उंडवडी कडे पठार येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तृणधान्य विकास कार्यक्रम रब्बी ज्वारी प्रकल्पातील शेतीदिन व शास्त्रज्ञ भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात प्रथानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनरचित हवामान आधारित पिक विमा योजना- फसल बीमा पाठशाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विमा प्रतीनिधी कदम साहेब यांनी गावातील शेतकरी यांना माहीती दिली. तसेच PMFME कर्ज मंजुरी सप्ताह कार्यक्रमामध्ये मंडळ कृषि अधीकारी उंडवडी सुपे श्री. अरविंद यमगर साहेब यांनी pmfme योजनेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कृषि विभागाच्या विविध योजना विषयी माहीती कृषि सहायक माधुरी पवार यांनी दिली. यावेळी उंडवडी क. प. चे सरपंच भरत बनकर,तसेच माजी सरपंच विठ्ठल जराड व जराडवाडी गावच्या सरपंच कल्पनाताई साळुंके व गावातील इतर प्रगतीशील शेतकरी व महीला मोठ्या संख्येने उपस्थीत होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *