कारंजा येथील ए .आर .सी पब्लिक स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला.

कारंजा येथील ए .आर .सी पब्लिक स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला.

बारामती (प्रतिनिधी गणेश तावरे) कारंजा शहरातील ए .आर .सी पब्लिक स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची 183 वी जयंती साजरी करण्यात आली .काल दिनांक 3 जानेवारी रोज सोमवार ला भारताच्या प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला .जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान राबविण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे राज्य शासनाने दिले आहेत या उपक्रमाअंतर्गत ए .आर .सी पब्लिक स्कूल येथे हा उपक्रम योग्य पद्धतीने राबविण्यात आला .शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका नासरे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य व स्त्रीमुक्ती दिना बद्दल मार्गदर्शन केले .सावित्रीच्या संघर्षाला प्रेरणा समजून मुलींनी मजबूत वाहायला पाहिजे असं मत शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका नासरे यांनी व्यक्त केले .कार्यक्रमाच प्रास्ताविक शाळेच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका स्नेहा मानवर , तर आभारप्रदर्शन किसन मात्रे यांनी केलं . या जयंती निमित्य शाळेतील इत्या 10 वी चे विद्यार्थी अमन पठाण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहीत सांगितली . या वेळी कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका नासरे ,स्नेहा मानवर ,किसन मात्रे शाळेतील शिक्षक शिक्षिका व शाळेतील संपूर्ण विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )