प्रतिनिधी – डिसेंबर महिन्यामध्ये हक्क अधिकार हमी केंद्र बारामती च्या माध्यमातून 4,5,6,7 डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मेडद, तांदुळवाडी, चौधरवस्ती, कटफळ या गावामध्ये केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या योजनानां घेऊन कॅम्प करण्यात आला होता. या कॅम्प मध्ये लोकांना योजनाबद्दल सविस्तर माहिती देणे तसेच ई – श्रम कार्ड, आयुषमान भारत गोल्डन कार्ड, हेल्थ आय डी सारख्या महत्वाच्या योजनाची कार्ड काढून देण्यात आली आहेत. हक्क अधिकार हमी केंद्राने योजनाचे कार्ड काढण्यास फक्त मदत केली नाही तर आता ती कार्ड प्रत्येक्ष लोकांच्या घरी नेऊन दिली आहेत. कार्ड काढण्यासाठी फक्त लॅमिनेशन फिस आकारली गेली. गव्हर्नमेंट प्रोसेसिंग खर्चात लोकांना योजनाचा लाभ घेता आला आहे. केंद्र हे गोदरेज कंपनीच्या सहयोगातुन बारामतीमध्ये कार्य करत आहे. भविष्यात सुद्धा अशा प्रकारच्या उपक्रमातुन लोकांना लाभ देण्याचे उद्देश्य हा केंद्राचा आहे….त्यामुळे केंद्राच्या कामाबाबतीत लोकाकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे मत हक्क अधिकार हमी केंद्राचे केंद्र प्रमुख करण चव्हाण यांनी व्यक्त केले.