जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन

पुणे, दि. २७: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना पुणे आणि पूना कॉलेज ऑफ आर्टस व सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२१-२२ चे आयोजन पिमसे हॉल, कॅम्प येथील पूना कॉलेज येथे ३० डिसेंबर २०२१ रोजी करण्यात येणार आहे

२०२१-२२ या वर्षाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने गुगल मीट या अॅपवर करण्यात येणार आहे. कलाकार आणि स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज क्रीडा अधिकारी श्रीमती शिल्पा चाबुकस्वार (९५५२९३१११९) व आशद शेख (८४८४८०३५२९) यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत, तसेच [email protected] या मेल वर सादर करावेत.

स्पर्धक, कलाकारांसाठी वयोगट १५ ते २९ वर्षे असा राहील. वय १२ जानेवारी २०२१ रोजी किमान १५ व जास्तीत जास्त २९ वर्षे असावे. नोंदणी करताना प्रवेशिकेसोबत आपले आधार कार्ड व जन्माचा दाखला जोडावा. याकरीता शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.

२९ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १ वाजेपर्यंत व्हॉटसॅप अथवा ई मेल अर्ज येतील अशा स्पर्धकांनाच कला सादर करण्याकरीता व्हॉट्सॲप क्रमांकावर लिंक पाठविण्यात येईल.

या युवा महोत्सवामध्ये सांघिक बाबी लोकनृत्य, लोकगीत आदींचा समावेश आहे. प्रवेश अर्ज सादर करताना त्यावर आपला व्हॉट्सॲप क्रमांक नमूद करावा. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, कला अकादमी, संस्था यातील इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *