भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे (वाॅटर कुलर) थंड पिण्याच्या पाण्याची सोय…

प्रतिनिधी – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा (स्मारक) येथे १४ एप्रिलला जयंती महोत्सवासाठी व इतर अनेक कार्यक्रमांसाठी हजारो भिमसैनिक अभिवादन करण्यासाठी येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये तसेच एप्रिल,मे महिन्यात ऊन्हाची तीव्रता जास्त असते, या गोष्टीची दखल घेऊन स्थानिक नगरसेविका मयुरी शिंदे यांनी पाठपुरावा करून त्याठिकाणी वाॅटर कुलर (थंड पिण्याचे पाणी) बसविण्यात आले.
या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते घेण्यात आला होता.
आमराई भागातील नागरिकांच्या मुलभुत गरजांकडे सौ.मयुरी शिंदे या सातत्याने लक्ष देत असतात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमी अग्रेसर असतात. लाईट,पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन या कामांना प्राधान्य देत मयुरी शिंदे यांनी आमराईकरांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
यावेळी नगरसेविका मयुरी शिंदे यांनी सांगितले की गेली तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये आमराई भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येत आहेत. विधानसभा, लोकसभेला मा.अजित दादा पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांनाही भरगच्च मतदान या भागातून होत असते. याचे एकमेव कारण म्हणजे मा.अजितदादा पवार यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून बारामती शहरात भरपूर विकास कामे होत असतात. बारामतीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *