प्रतिनिधी- दि. 22 ऑक्टोबर 2021 रोजी, भाजीपाला गुणवत्ता केंद्र ( भारतातील पहिला इंडो-डच प्रकल्प) कृषी विज्ञान केंद्र बारामती, पुणे यांनी विद्यार्थी, संशोधक, विस्तार अधिकारी, उद्योजक, शास्त्रज्ञ व शेतकरी वर्ग यांच्यासाठी “माती विना शेतीमधील संधी आणि आव्हाने” या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी मा. डॉ.प्रशांतकुमार पाटील सर, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी भाजीपाला गुणवत्ता केंद्र ( भारतातील पहिला इंडो-डच प्रकल्प) कृषी विज्ञान केंद्र बारामती, पुणे यांचे अशा अभिनव विषयावर वेबिनार आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. भारतीय शेतकऱ्यांसाठी आगामी काळात माती विना शेतीसाठी सध्याचे महत्त्व आणि या तंत्रज्ञानाची व्याप्ती याबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच गेल्या वर्षभरात केलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्र, केव्हीके, बारामती ने केलेल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले. शेतकऱ्यांना दर्जेदार भाजीपाला रोपांचा पुरवठा 35 लाख (कलमी आणि कलम न केलेली बियापासून तयार केलेली भाजीपाला रोपे), NHB, NHM, RAMETI आणि YASHADA चे अधिकृत प्रशिक्षण केंद्र: 1015 शेतकरी प्रशिक्षित. FPO/ FPC लिंकेजद्वारे शेतकऱ्यांशी सहकार्य 6 FPO तयार केल्या.
श्री नीक बॉटडेन, होल्लंडडोर कोऑपरेटिव्ह यूए, नेदरलँड्स, यांनी पहिल्या तांत्रिक सत्रादरम्यान, कमी तंत्रज्ञान ते उच्च-तंत्रज्ञान वापरून माती विना भाजीपाला शेती कशा प्रकारे केली जाते याची माहिती दिली. त्यांनी डच तंत्रज्ञान वापरून माती विना शेतीच्या संधींवर देखील लक्ष केंद्रित केले. माती विना तंत्रज्ञानात पीक उत्पादन अनुकूल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची माहिती सांगितली. दुसऱ्या तांत्रिक सत्रात श्री.राजेंद्र कुमार, क्रावो इक्विपमेंट लिमिटेड, कॅनडा, त्यांनी माती विना शेती आणि हवामान व्यवस्थापनासाठी हाय-टेक रिट्रेक्टेबल रूफ पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी या विषयावर माहिती दिली. शेवटचे तांत्रिक सत्र श्री यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ (फलोत्पादन), केव्हीके बारामती आणि प्रकल्प प्रमुख भाजीपाला गुणवत्ता केंद्र, केव्हीके, बारामती यांनी राबविलेल्या आधुनिक डच तंत्रज्ञान या विषयाची माहिती सर्वाना दिली.
अ) उच्च तंत्रज्ञान वापरून भाज्या उत्पादन घेणे (माती विना शेती / हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान)
ब) भाजीपाला उत्पादनाचे माती विना तंत्रज्ञानावर संशोधन व विदेशी पालेभाज्या पिकांच्या लागवडीचे तंत्र.
क) विदेशी पालेभाज्या पिकांच्या लागवडीचे एरोपोनिक्स तंत्र
डी) भाजीपाला पिकांच्या उत्पादन तंत्रज्ञानावर हाय-टेक फोर्स्ड व्हेंटिलेटेड पॉली हाऊस अंतर्गत संशोधन
ई) स्वयंचलित पाणी व खत व्यवस्थापन
F) भाजीपाला रोपे तयार करताना कलम तंत्रज्ञानाचा वापर
जी) अतिनील निर्जंतुकीकरण यंत्राच्या मदतीने पाण्याचे पुनर्वापर.
डॉ जाधव आर.एस, प्रभारी, प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ, केव्हीके बारामती (पुणे -1) यांनी आभार व्यक्त केले. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, मध्यप्रदेश एकूण 112 लोकांनी सह्भाग नोंदविला आणि नेदरलँड आणि जर्मनी देशातील 4 लोक सहभागी झाले होते. या वेबिणारचे आयोजन श्री यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ (फलोत्पादन), केव्हीके बारामती आणि प्रकल्प प्रमुख भाजीपाला गुणवत्ता केंद्र, केव्हीके, बारामती यांनी केले होते.