बारामती: (इंद्रभान लव्हे, प्रतिनिधी) ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने वय वर्ष २ ते १८ या वयोगटातील लहान मुलांसाठी भारत बायोटेकची कोवेक्सिन दिली जाणार आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आई-वडिलांची काळजी कमी होऊन विरुद्धची लढाई बळकट होणार आहे भारत बायोटेक ने २०२१ मध्ये देशभरात २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर कॉवेक्सिन लसीची चाचणी घेतली होती. या मुलांना २८ दिवसाच्या अंतराने २ लसी दिल्या होत्या. त्यात त्या मुलांवरील चाचण्या प्रभावी दिसून आल्या. तसेच या चाचण्यांमध्ये वाईट परिणाम दिसले नाहीत. परंतु लहान मुलांचे लसीकरण केव्हा सुरू होईल अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जरी लहान मुलांसाठी कोरोना लस उपलब्ध झाली असली तरी केंद्र सरकार नवीन नियमावली बनवत आहे लसींची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे या लसी सर्वात आधी ज्या मुलांना आणि व्याधी अस्थमा कॅन्सर यांसारख्या समस्या आहे, त्यांनाच आधी लस देण्यात येणार आहे.