प्रतिनिधी – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत रब्बी ज्वारीचे प्रकल्प नियोजन करण्यात आले होते. यामध्ये शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषि विभाग बारामती यांचे मार्फत व मंडळ कृषि अधिकारी, उंडवडी सुपे यांच्या मार्गर्शनाखाली बियाणे वाटप कार्यक्रम व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. शेतकऱ्यांनी सुधारीत पद्धतीने लागवड करून उत्पादनात वाढ करणे, त्याच प्रमाणे उत्कृष्ट पद्धतीचा कडबा (चारा) उत्पन्न करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सदर कार्यक्रम दिपक शिवाजी मांढरे यांच्या शेतामध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती योगिता सांगळे, कृषि सहाय्यक यांनी केले व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ रुपाली विजय चव्हाण या उपस्थित होत्या. व गावातील इतर प्रगतशील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.