प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत दिनांक 9/10/ 2021 रोजी मौजे माळेगाव बुद्रुक येथे क्रॉपसॅप संलग्न सोयाबीन शेतीशाळा व शेती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शक शास्त्रज्ञ श्री महेश जाधव (कृषी विज्ञान केंद्र बारामती) यांनी एकात्मिक सोयाबीन पिक व्यवस्थापक आणि सोयाबीन प्रक्रिया उद्योग यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच प्रगतशील शेतकरी अशोक पाटील तावरे यांनी सेंद्रिय शेती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, बलराम शेतकरी गट प्रतिनिधी बाळासाहेब तावरे यांनी सोयाबीन बियाणांची साठवणूक व विक्री याविषयी चर्चा केली यावेळी सोयाबीन प्रात्यक्षिक प्लॉट ला भेट देण्यात आली या कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक श्री नेमाजी गोलांडे, कृषी सहाय्यक श्रीमती कोमल भानवसे, तसेच प्रतिभा फार्मस कंपनी आणि बलराम शेतकरी गटाची सर्व सदस्य व इतर शेतकरी उपस्थित होते.