प्रतिनिधी – दिनांक शुक्रवार ८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासन कृषि विभाग व तालुका कृषि अधिकारी दौंड यांच्या वतीने नंदादेवी येथे क्रॉपसॅप अंतर्गत खरीप हंगामातील मका पिकाची शेतीशाळा वर्ग क्र १० व शेतीदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंडळ कृषि अधिकारी पाटस महेंद्र जगताप, कृषि सहाय्यक अझरूद्दीन सय्यद, अतुल होले,आत्मा चे तंञज्ञ महेश रुपनवर ,नंदादेवीचे उपसरपंच प्रमोद आटोळे, शेतकरी अविराज गावडे, विशाल वाकळे, सुरेश पोंदकुले, दत्तात्रय पोंदकुले,आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी महेंद्र जगताप यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली, महेश रुपनवर यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनांबद्दल माहिती दिली, अझरुद्दीन सय्यद यांनी मका पिकाचे मुल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग याबाबत माहिती दिली, नामदेव जरांडे, अविराज गावडे यांनी शेतीशाळा मधील अनुभव व मका पीक लागवड मधील स्वतः चे अनुभव सांगितले, तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उस्फूर्त प्रतिक्रिया दिल्या, शेतीदिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल होले यांनी केले तर शेतीदिन आयोजन व आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक अंगद शिंदे यांनी केले.