प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी दौंड व मंडळ कृषी अधिकारी पाटस यांच्या वतीने क्रॉपसॅप अंतर्गत ऊस पीक शेती शाळा वर्ग क्र 7 वरवंड ता.दौंड येथे दिनांक 09/10/2021 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थिती भीमा सहकारी साखर कारखाना दौंड चे व्हॉइस चेअरमन मा श्री नामदेव नाना बारवकर, गोरक्ष बारवकर (रिसोर्स पर्सन), राजेंद्र बारवकर प्रगतशील शेतकरी, सावंत सर, व इतर शेतकरी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शेतीशाळा किट वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री सावंत यांनी ऊस पिकाविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच श्री गोरक्ष सावता बारवकर रिसोर्स पर्सन यांनी ऊस पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन व पावसाळ्यामध्ये ऊस पिकाची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर राहुल लोणकर कृषी सहाय्यक यांनी पुढील वर्गाचे नियोजन सांगून आभार मानले.