नानासाहेब साळवे
प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व जुनीअर कॉलेज या ठिकाणी इ 8 वी ते 10 वी पर्यंतची शाळा तसेच 11 व 12 वी विज्ञान व एम सी व्ही सी विभाग शासन निर्णयानुसार आज मोठ्या उत्साहात व आनंदात भरली. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल ताश्यांच्या गजरात गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थांपैकी इ 8 वी च्या विद्यार्थाना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठपुस्तके वाटप करण्यात आली. कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करत सर्व विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले, तसेच सर्व वर्गखोल्या निर्जंतुक करण्यात आल्या होत्या. बऱ्याच दिवसांनी शाळा भरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री झाकीर शेख, उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे, पर्यवेक्षक श्री रमेश जाधव , तसेच उपशिक्षक श्री तानाजी शिंदे, श्री सुदाम गायकवाड, प्रदीप पळसे, श्री मोहन ओमासे, श्री सुनील चांदगुडे, श्री गुळवे, श्री सुधीर जाधव, सौ. जयश्री हिवरकर , तसेच विद्यालयातील इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.