बारामती (प्रतिनिधी,गणेश तावरे) – राजकीय पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामती मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी असणाऱ्या neet परीक्षेचे ज्ञान घेण्यासाठी विध्यार्थी दूर वरून येत असतात यामध्ये सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, पुणे या जिल्ह्यातील विध्यार्थी गेल्या काही वर्षांपासून बारामती येथे शिक्षण घेत आहेत.
बारामती मध्ये असणाऱ्या विविध नामांकित शिक्षण संस्थांनी वारंवारच बारामतीची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. बारामतीची शैक्षणिक क्षेत्रात होणारी प्रगती हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चा सिंहाचा वाटा आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
बारामतीमधील क्रीएटीव्ह सायन्स अकॅडमीने या वेळी NEET २०२०-२१ चा संभाव्य निकाल काय असेल हे Answer Key पडताळून पहिली असता निकाल काय असू शकतो याबाबत माहिती दिली आहे.
क्रीएटीव्ह सायन्स अकॅडमीचे संचालक एस.टी.काळे व बी. आर.घाडगे यांनी माहिती दिली आहे कि यावेळी क्रीएटीव्ह सायन्स अकॅडमीचे NEET २०२०-२१ मध्ये बायोलॉजी या विषयात साधारणतः 3 विदयार्थी पैकीच्या पैकी गुण म्हणजे 360 पैकी 360 गुण मिळून संपूर्ण भारतात बारामतीचे नाव करतील तर त्याचबरोबर NEET ओव्हर ऑल विषयात 720 पैकी 631 पर्यंत विद्यार्थी मजल मारतील असा अंदाज करण्यात आला आहे.
NEET हि सर्वात कठीण वैदयकिय पात्रता परीक्षा मानली जाते व हे परीक्षा राष्ट्रीय एजन्सी ( NTA) द्वारे दरवर्षी घेण्यात येते. वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी भारत सरकारची ही पात्रता परीक्षा पात्र असणे अनिवार्य आहे.
साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात NEET चा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि या निकालाकडे सर्वाचें लक्ष वेधून घेतले आहे.