प्रतिनिधी :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत अंजनगाव येथे रब्बी ज्वारी प्रकल्प राबविण्यात येत आहे. येथील प्रेरणा शेतकरी गटाला कृषी विभागामार्फत रब्बी ज्वारी फुले रेवती चे बियाणे वाटप करण्यात आले. प्रकल्पांतर्गत एकरी प्रत्येक शेतकऱ्यास चार किलो बियाणे प्रमाणे 25 शेतकऱ्यांना बियाणे वाटप केले. यावेळी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. बीज प्रक्रिया करून बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणी करण्याच्या सूचना मंडळ कृषी अधिकारी यमगर यांनी दिल्या आहेत. कृषी सहाय्यक श्रीमती आडके यांच्या उपस्थितीत बियाणे वाटप करण्यात आले. शेतकरी गटातील सर्व शेतकरी या वेळी उपस्थित होते.