मळद येथील एकता शेतकरी महिला गटाचा सन्मान

प्रतिनिधी :- पोषण मूल्य व आरोग्यदायी परसबाग पोषण थाळी स्पर्धा 2021 कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मळद गावातील एकता शेतकरी महिला गट यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मा.श्री.नामदेवराव शिंदे यांनी एकता शेतकरी महिला गटाचा सत्कार केला. तसेच पोषण थाळी कशी तयार केली याची माहिती घेतली. यावेळी गटातील सर्व महिला उपस्थित होत्या. तसेच एकता शेतकरी ग्रुप तर्फे शिंदे साहेबांचा गाय-वासराची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत शेंडे, सचिव नानासो गावडे, जयप्रकाश घाडगे,चारुदत्त गावडे, दादा आटोळे, शशिकांत होले मनीष हिंगणे, नानासो फरांदे व गावचे पोलीस पाटील अविनाश गावडे उपस्थित होते.

तसेच बारामती तालुका कृषी विभाग यांच्यातर्फे एकता महिला शेतकरी गटातील महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री.वैभव तांबे व तालुका कृषी अधिकारी सौ सुप्रिया शिळीमकर ( बांदल ) व कृषी विभागातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *