प्रतिनिधी : ( गणेश तावरे ) केंद्र सरकारच्या कामगार, कष्टकरी, शेतकरी व सामान्य जनता यांच्या हिताविरुद्ध असणाऱ्या धोरणांच्या विरोधात तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेला बंद सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी च्या औद्योगिक देशव्यापी बंद मध्ये बारामती एमआयडीसी व परिसरातील सर्व कंपनीतील कामगार संघटना, कामगार बंधू- भगिनी यांनी बारामती तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय येथे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन निषेध नोंदवला.
याबाबत सविस्तर बातमी अशी की केंद्रातील कामगार कायद्यांमध्ये अत्यंत भयानक असे कामगार विरोधी बदल केले असून कामगारांची सेवा, सुरक्षा, वेतन सुरक्षा, सामाजिक सुरक्षा धोक्यात आहे. कोरोना काळातील शांततेचा फायदा घेऊन संरक्षण, विमा व बँकांसारख्या मूलभूत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम देखील विकण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्वत्र कंत्राटीकरण सुरू आहे. त्यात शेतीमालाला कवडीमोल भाव व नापिकीमुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे, त्यांना तत्काळ सहाय्य देण्याची गरज आहे, बडे जागतिक व्यापारी कंपन्यांच्या दावणीला भांडणारे हे तीन काळे कायदे त्यांनी केलेले आहेत असे यावेळी कामगार संघटनेने मत व्यक्त करण्यात आले. यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी आज ग्रीव्हज कॉटन अँड अलाईड कंपनीज, एम्प्लॉईज युनियन बारामती, भारतीय कामगार सेना, पुना एम्प्लॉईज युनियन वोलमॉँट इंदापूर यासह विविध संघटनांनी आज बारामती येथे आपला रोष व्यक्त करत निषेध नोंदवला.