प्रतिनिधी :- बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवण व दौंड तालुका कृषी कार्यालय दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मा अंतर्गत स्थापित अकुल शेतकरी उत्पादक कंपनी बोरीपार्धी यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बोरीपार्धी येथे शेतकरी उत्पादक कंपनी तील सभासदांसाठी प्रक्रिया उद्योग व मार्केटिंग या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्याक्रमाचे प्रमुख पाहुणे दौंड कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी राहुल माने, मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील बनकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे गणेश शेरकर, प्रभारी अधिकारी उमेश निकम, देवा फलफले, पोपट लकडे, कृषीसहाय्यक जी.डी.कदम, एस.एस झरकर, कार्यक्रमाचे मार्गदर्शक नितीन बेंद्रे हे उपस्थित होते. या यावेळी शेतकरी उत्पादक कंपनी तील सर्व सभासदांनी आपले ई पीक पाणी लावून घेण्याचे तसेच कृषी योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी केले, तसेच मार्केटिंग करण्यासाठी सर्व सभासदांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या संबंधातील भागातील आवश्यक पिके यांची निवड करून त्यावर प्रक्रिया करावी व त्याचे मार्केटिंग करावी असे केले तरच आपल्याला योग्य नफा मिळेल असे मत नितीन बेंद्रे यांनी व्यक्त केले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा केडगाव चे कृषी अधिकारी यांनी पीक कर्ज व प्रक्रिया उद्योग या योजने बद्दल माहिती दिली, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश निकम यांनी केले, सूत्रसंचालन देवा फलफले यांनी केले व आभार संजय ताडगे यांनी मानले
कार्यक्रमाचे नियोजन मोनिका ताडगे, अजित शंकर ताडगे, अर्चना ताडगे यांनी केले.