अन्न व औषध प्रशासनातर्फे पुणे जिल्हयातील गुऱ्हाळ मालकांसाठी 26 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि.२४:- अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई मध्ये काही गुळ उत्पादक चुकीच्या मार्गाने गुळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकास उत्तम दर्जाचा गुळ मिळावा व गुळ उत्पादकांनी चांगल्या दर्जाचे गुळ उत्पादन कशा रितीने करावे याबाबत अन्न व औषध प्रशासनातर्फे २६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता बालाजी मंगल कार्यालय, हांडाळवाडी, म्हसोबा चौक, केडगाव ता. दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००९, हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ५ आगस्ट २०११ पासुन लागु झालेला असुन या कायद्याचा प्रमुख उददेश नागरिकांना सुरक्षित, सकस व निर्मळ अन्न पदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे. या कार्यशाळेमध्ये मार्क लॅब पुणे येथील डॉ. वसुधा केसकर व अन्न व औषध प्रशासनचे विधी अधिकारी
संपतराव देशमुख हे अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियमने २०११ अंतर्गत व प्रचलित व अदयावत गुळ उत्पादना विषयी मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर दिवशी पुणे जिल्हयातील सर्व गु-हाळ व्यवसायिकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व व्यवसायासाठी आवश्यक परवाने घेवूनच व्यवसाय करावा. यानंतरही संबंधितांनी परवाने घेतले नसल्याचे आढळल्यास त्यांच्या विरुध्द कायदयातंर्गत तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे, अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *