टेक्निकल विद्यालयात मोबाईल बँक उपक्रमाने कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

बारामती : येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयामध्ये पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134 वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.
बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्याप्रतिष्ठान महाविद्यालय, राधेश्याम एन आगरवाल टेक, विद्यालय, शाहू हायस्कूल बारामती व इतर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त कर्मवीर जयंती साजरी केली जाते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कर्मवीर अण्णांनी गोरगरीब वर्गातील बहुजनांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली याचीच जाणीव ठेवून सध्या कोविड मुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, या ऑनलाईन शिक्षणापासून गरिबीमुळे दूर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल बँक उपक्रम विद्यालयाने राबवला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून या गरीब विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अभ्यासासाठी मोबाईल दिला जातो. समाजातील काही दानशूर पालकांनी हे मोबाईल विद्यालयाला भेट म्हणून दिले आहेत. अजून काही इच्छुक पालकांनी विद्यालयाच्या या उपक्रमास मदत करण्याचे आवाहन विद्यालयाचे प्रा.श्री झाकीर शेख यांनी केले. या उपक्रमाची सुरुवात कर्मवीर जयंतीदिनी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री सदाशिव सातव व दिलीप ढवाण यांच्या हस्ते झाली. प्रसंगी कर्मवीरांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री सदाशिव सातव, दिलीप ढवाण, संयुक्त कर्मवीर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य.श्री चंद्रशेखर मुरूमकर, जयंती समितीचे समन्वयक श्री आगवणे, विद्यालयाचे प्रा.श्री झाकीर शेख, उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे, पर्यवेक्षक श्री जाधव रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य श्री अर्जुन मलगुंडे, शिक्षक नेते श्री गणपतराव तावरे, ज्युनिअर विभागप्रमुख श्री आनंदराव करे, एम.सी.व्ही.सी विभागप्रमुख श्री सुधीर जाधव, व विद्यालयातील इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *