बारामती: (इंद्रभान लव्हे ) उपमुख्यमंत्री अजित पवार हे १८/०९/२०२१ बारामती दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी ६ वाजताच एका कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, अशा शब्दात अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले
अधिकाधिक विकासकामे मार्गी लावून पवारसाहेबांच्या स्वप्नातील बारामती निर्माण करतोय.विकास प्रक्रिया हे एकट्या दुकट्याचं काम नाही.सर्वांनीच यामध्ये सहभागी व्हायला हवं, असेही अजित पवार म्हणाले. प्रत्येक शनिवारी अजित पवार बारामतीत विकास कामाचा आढावा घेतात. यावेळी अधिकाऱ्यांनी एका कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगितले .मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या,
अधिकाऱ्यांना सकाळी सहा वाजल्यापासून कामे हाती घेतल्या पाहिजे, अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनीही कामे करायला हवी. या विकासकामांच्या हेतू बारामतीकरांना सोई सुविधा
उपलब्ध करून देण्याचा आहे कोणत्याही विकासकामासाठी निधी कमी पडल्यास पुरवणी
मागण्यात तरतूद करु, असेही पवार म्हणाले. बारामतीकरांची साथ असल्याने आपण मी लोकप्रतिनिधी म्हणून विकास करु शकतो.तसेच पेट्रोल डिझेल गॅस हे उधारीवर देऊच नका. माझी गाडी आली तरी पैसे आधी घ्यायचे व उधारीचा धंदा नको, ग्राहकांशी नीट वागा उद्धट वागू नका व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासद मेळावाही आज ४ वाजता होणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच सध्या आपल्याला इलेक्ट्रिक वाहनांवरच भर द्यायला हवा मीदेखील पंधरा दिवसापूर्वी इलेक्ट्रिक रिक्षा चालवून बघितली आहे अजित पवारांनी पुणे जिल्हा बँक भरती वरही आपले मत मांडले आहे लेखी परीक्षेत पास झाल्यावर कोबा झाल्याशिवाय कोणाचीही भरती केली जाणार नाही मिरच्या मुलांना मुला मुलींनाही यावेळी संधी दिली जाणार आहे असं अजित पवार म्हणाले व पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.