प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी दौंड व मंडळ कृषी अधिकारी पाटस यांच्या वतीने हिंगणीगाडा ता.दौंड येथे दिनांक 01/10/2021 रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत पौष्टिक तृणधान्य रब्बी ज्वारी बियाणे वाटप, शेतकरी प्रशिक्षण, बीज प्रक्रिया कार्यक्रम पर पडला. या वेळी प्रमुख मार्गदर्शन पोपट चिपाडे कृषी पर्यवेक्षक पाटस 1 यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा.सरपंच श्रीमती किर्ती अरुण खराडे, रवींद्र गायकवाड ग्रा. प.सदस्य, विलास शिंदे प्रगतशील शेतकरी, राहुल लोणकर कृषी सहायक हिंगणीगाडा उपस्थित होते.
या वेळी ज्वारी पिकासाठी बीज प्रक्रिया विषयी मार्गदर्शन राहुल लोणकर यांनी केले. त्यानंतर चिपाडे यांनी ज्वारी पिकाविषयी पेरणी ते काढणी पर्यंत सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रात्यक्षिकासोबत देण्यात येणाऱ्या निविष्ठा विषयी माहिती दिली. तसेच निवड झालेल्या 50 शेतकऱ्यांना माती परिक्षणासाठी माती नमुना कसा घ्यावयाचा या विषयी मार्गदर्शन केले व माती नमुने लवकरात लवकर जमा करण्यात सांगितले. त्याचबरोबर महा DBT योजना विषयी मार्गदर्शन केले. PMFME विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच MREGS फळबाग लागवड नाडेप टाकी, गांडूळ युनिट विषयी माहिती देण्यात आली. तसेच शेवटी राहुल लोणकर कृषी सहायक यांनी ज्वारी प्रकल्प कालावधीत राबविण्यात येणाऱ्या बाबी जसे माती परीक्षण, शेती दिन, तज्ञांचे मार्गदर्शन व शास्त्रज्ञ भेट हे उपक्रम राबविले जाणार आहेत यांची माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.