प्रतिनिधी – बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात आयोजित ‘स्वर रंग’ २०२३ या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात विद्या प्रतिष्ठान वास्तुकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले. युवकांच्या कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला गेला. वास्तुकलेच्या चौथ्या वर्षाच्या हिदा अत्तारने छायाचित्रण स्पर्धेत प्रथम क्रमांक तर तृतीय वर्षाच्या शांतनू मुंडलिक ने भित्तीचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. वादविवाद स्पर्धेत तृतीय वर्षाच्या अगस्त्या भोपळे आणि प्रेरणा धापटे यांनी प्रथम तर आर्य रणवरे ने रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. मांडणी कलेत तृतीय वर्षाच्या शिवांजली भोसले, कोमल जगताप, तेजस जाधव आणि सुशांत परकाळे यांच्या चमूने प्रथम क्रमांक मिळवला तर तृतीय वर्षाच्या ऋतुजा नामे ने व्यंगचित्र कलेत द्वितीय व द्वितीय वर्षाच्या दीक्षा बोबडे ने मेहंदी काढण्यात द्वितीय क्रमांक मिळवला. इतर विद्यार्थ्यांनी एकल नृत्य, स्थळ चित्रण, प्रहसन, समूह गीत, तालवाद्य वादन, माती काम, स्थळ चित्र या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना सहायक प्राध्यापक राजेश केकते यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा निकिता थोरात, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा प्रियांका बर्गे व प्राचार्या राजश्री पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले.