प्रतिनिधी : दिपक वाबळे – आज युगेंद्रदादा पवार फाउंडेशन महाराष्ट राज्य यांच्या वतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना बॅगचे वाटप करण्यात आले. देऊळगाव रसाळ , सोनापिरवाडी , रसाळवाडी नं १ , रसाळवाडी नं २ , कोरोळी ,नारोळी ,मांगोबाचीवाडी , खंडूखैरेवाडी , चांदगुडेवाडी , अंबिखुर्द , मोरगाव , कारखेल , खराडेवाडी , सोनवडी सुपे , उंडवडी सुपे , उंडवडी क प , गोजुबावी या परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जाऊन तेथील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना बॅग देण्यात आली.
शाळेमधील विद्यार्थ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण तयार व्हावे व विद्यार्थ्यांना शाळेचे गोडी लागावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे युगेंद्रदादा फाउंडेशनचे सदस्य श्री. प्रदिप गोंडगिरे व पुष्पराज निंबाळकर यांनी सांगितले
युगेंद्रदादा पवार यांच्या मातोश्री सौ. शर्मीलावहिनी पवार सामाजिक बांधिलकी जपत असताना ओढा खोलीकरण , वृक्षारोपण , महिला सबलीकरण असे कार्य करत असताना युगेंद्रदादा पवार सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत समाज उपयोगी कार्य करत आहेत.
देऊळगाव रसाळ येथे कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामसेवक श्री. दिपक बोरावके , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दिपक नाना वाबळे , मुख्याध्यापक श्री. सतिश काकडे , श्री. बापूराव कांबळे , सौ. गाडेकर मॅडम उपस्थित होते.