एल जी बनसुडे विद्यालयामध्ये राष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा

प्रतिनिधी :- आज पळसदेव या ठिकाणी राष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्री श्रीकांत पाटील तसेच एल.जी बनसुडे शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंत (नाना) बनसुडे, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे तालुका संघटक जनार्धन पांढरमिसे व पळसदेवचे सरपंच इंद्रायणी सुजित मोरे, उपसरपंच पुष्पलता राजेंद्र काळे, सदस्यां जयश्री शेलार, सदस्य कैलास भोसले , सचिव नितिन बनसुडे, प्राचार्य सुरज बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे , तात्यासाहेब बंडगर, दादासाहेब खारतोडे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना या माहितीचा अधिकार व ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे अनुभवाचे बोल या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकारी कायद्याविषयी मार्गदर्शन केले. हा कायदा माहिती स्वातंत्र्याचा कायदा आहे या कायद्याने शासकीय कामकाजाची सर्व माहिती घेता येते. आपण शासनाला टॅक्स रूपाने जो कर भरतो त्याची देखील माहिती आपण या कायद्याच्या माध्यमातून घेता येते. हा कायदा अत्यंत महत्त्वाचा असून 65 वर्षानंतर भारतीय नागरिकांना मिळालेले खरे स्वातंत्र्य आहे. कायद्याचे महत्त्व व त्याबाबत असणारे फायदे व जागृकता याबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन केले व साहेबांच्या हस्ते सन २०२० – २१ मध्ये इ १० वी व इ १२ वी च्या प्रथम तीन क्रमांकाना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (नाना) बनसुडे यांनी पुरणाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने स्वच्छता पाळली पाहिजे व त्यासाठी योगा व्यायाम या बाबत मार्गदर्शन केले यांनी व जनार्दन पांढरमिसे व तालुका संघटक मान्यवरांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला सूत्रसंचालन प्रवीण मदने व आभार प्रदर्शन दीपक वडापूरे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *