प्रतिनिधी :- बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीमध्ये चोरून अवैध्यरित्या वाळु वाहतुक करीत असल्याने प्रभारी अधिकारी यांनी वाळु वाहतुकीवर व अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश पोलीसांना दिले असताना इतर अवैध धंदयावर कारवाई करीत असताना ता. १५/०९/२०२१ रोजी प्रभारी अधिकारी महेश ढवाण यांना व डी बी पथक यांना रात्रगस्त पेट्रोलींग चालु असताना माहीतीदारा मार्फत माहीती मिळाली कि, पिवळया रंगाचा अशोक लेलंड कंपनिचा ट्रक कटफळ चौक ते एम आय डी सी बारामती रोडने वाळु वाहतुक करीत असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक महेश ढवाण व त्याचे पथकाने सरकरी वाहणासह पाठलाग करून सदरचे वाहण ताब्यात घेवुन सदर ट्रक नं एम एच ४२ ऐ वाय ८८०० व आरोपी शुभम राजेंद्र आटोळे रा शिरवली ता बारामती जि. पुणे यास ताब्यात घेतले. सदर बााबत त्यांचेवरती बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गु र नं ५४८/ २०२१ भा द वी कलम ३७९ खाण आणी खनिज कायदा कलम ९,१५ सह अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन एकुण ६,३६,०००/- किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. श्री.डॉ अभिनव देशमुख सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, श्री.
मिलींद मोहीते सो, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग बारामती, श्री.नारायण शिरगावकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती, श्री महेश ढवाण सो पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल शेळके यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *