माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती. व टेस्टी बाईट फौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दौंड तालुक्यातील देऊळगाव येथे ‘एकात्मिक शेती व्यवस्थापन’ या प्रकल्पा अंतर्गत ‘मूलस्थानी जलसंधारण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा वेळी कृषि विज्ञान केंद्र, बारामती.चे प्रमुख डॉ. रतन जाधव यांनी ‘मुलस्थानी जलसंधारण व रब्बी ज्वारीसाठी पंचसूत्री लागवड तंत्रज्ञान या विषयी महिती देण्यात आली आणि श्री.भाऊसाहेब जगताप यांच्या प्लॉट वर १०x१० मिटर चे गादी वाफे तयार करून मूलस्थानी जलसंधारणाचे प्रात्येक्षिक दाखवण्यात आले तसेच मूरघास तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर रब्बी ज्वारीचे पंचसूत्री लागवड तंत्रज्ञान’ व जमीनीच्या प्रकार नुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी रब्बी हंगामास शिफारस केलेल्या ज्वारीच्या जिरायत जमीनी साठी ‘फुले अनुराधा’ वाण आणि मध्यम जमिनी साठी ‘फुले सुचित्रा’ या वाण विषयी मार्गदर्शन केले व या वानांचे बियाणे पुरवठा प्रात्येक्षिकासाठी करण्यात आला. या कार्यक्रम करीता देऊळगाव गावा मधील महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी बांधव एकून ४२ शेतकरी उपस्थित होते व देऊळगाव चे सरपंच श्री.विशाल बारवकर व ग्रामपंचायत सदस्य श्री.राजवर्धन जगताप, श्री. भाऊसाहेब शितोळे व श्री. अक्षय बारवकर उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.भाऊसाहेब शितोळे यांनी केली व आभार श्री.राजवर्धन जगताप यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *